Central Railway: आता लोकलमधील विक्रेत्यांना मिळणार अधिकृत परवाने, मध्य रेल्वेचा निर्णय

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये दररोज ४० लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात.

128
Central Railway: आता लोकलमधील विक्रेत्यांना मिळणार अधिकृत परवाने, मध्य रेल्वेचा निर्णय
Central Railway: आता लोकलमधील विक्रेत्यांना मिळणार अधिकृत परवाने, मध्य रेल्वेचा निर्णय

लोकल ट्रेनपासून (Central Railway) लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये सध्या अनेक विक्रेते बेकायदेशीरपणे व्यवसाय करून आपलं पोट भरतात. चणे, शेंगदाणे, गोळ्या, कानातले, रबर अशा विविध प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तूंची विक्री करणारे बेकायदेशीर विक्रेते आता अधिकृत होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये दररोज ४० लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, मात्र परवान्याशिवाय खाद्यपदार्थ आणि वस्तू विकून ते आपला व्यवसाय करतात, अशा फेरवाल्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे मध्य रेल्वेने ठरवले आहे.

(हेही वाचा – Diwali 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान यंदाही हिमाचल प्रदेशात )

या फेरीवाला विक्रेत्यांमुळे रेल्वेला कोणताही महसूल मिळत नाही. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रवाशांनाही नाहक त्रास होतो. याची दखल मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतली आहे. या विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, उपनगरीय मार्गावर १५०० आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये ५०० विक्रेत्यांना तीन वर्षांसाठी अधिकृत परवाना दिला जाईल. त्यामुळे रेल्वेच्या महसुलातही भर पडेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून देण्यात आली आहे.

परवानाधारक विक्रेत्यांना मोबाईल, लॅपटॉपसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्टेशनरी उत्पादने, वृत्तपत्र, मासिके, पुस्तके, पॅक केलेले अन्नपदार्थ, वृत्तपत्र, मासिके, पुस्तके, पेय, स्टेशनरी उत्पादने विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. नुकत्याच काढलेल्या निविदांमध्ये अधिकृत परवाना घेतलेल्या विक्रेत्यांना एसी लोकल ट्रेनमध्येही आपल्या वस्तूंची विक्री करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.