सध्या क्रिकेट विश्व चषक सामन्यांमध्ये अव्वल स्थानी असलेला South Africa च्या संघातील फिरकी गोलंदाज केशव महाराजने 24 नोव्हेंबरपासून बँकॉक येथे होणाऱ्या तीन दिवसीय जागतिक हिंदू काँग्रेस (WHC)-2023 ला पाठिंबा दर्शविला आहे. वर्ल्ड हिंदू फाउंडेशनने आयोजित केलेल्या या परिषदेला 60 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याने ‘जय श्री राम’ चा नारा दिला.
WHC ने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये महाराज म्हणाला, सर्वांना नमस्कार. बँकॉक येथे होणाऱ्या जागतिक हिंदू काँग्रेससाठी मी माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. दुर्दैवाने, विश्वचषकातील वचनबद्धतेमुळे मी तिथे येणार नाही, परंतु मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आशा आहे की हा एक अद्भुत कार्यक्रम होईल. जय श्री राम.
(हेही वाचा Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य)
केशव महाराज भारतात चालू असलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिके (South Africa)च्या क्रिकेट संघाचा भाग आहे. कॉन्फरन्स आयोजकाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तो आपल्या देशाच्या संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे, ज्याने उपांत्य फेरीसाठी यशस्वीपणे पात्रता मिळवली आहे. पहिली परिषद 2014 मध्ये दिल्लीत आणि दुसरी परिषद 2018 मध्ये शिकागो येथे झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ WHC-2023 ला संबोधित करणार आहेत.
Join Our WhatsApp Community