सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी रियाधमध्ये (Arab-Islamic Summit) अरब नेते आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्या बैठकीत गाझामधील हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. या बैठकीदरम्यान हे युद्ध इतर देशांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या बैठकीचे उद्घाटन करताना क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांसाठी सौदी अरेबिया इस्रायली अधिकाऱ्यांना जबाबदार धरते. आम्हाला खात्री आहे की या प्रदेशात सुरक्षा, शांतता आणि स्थिरतेची हमी देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कब्जा, घेराबंदी संपवणे. करताना क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गाझा आणि व्याप्त वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कृतींबद्दल टीका केली.
(हेही वाचा- Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य)
मार्चमध्ये दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यानंतर सौदी अरेबियाच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले इराणचे राष्ट्रपति इब्राहिम रायसी म्हणाले की, गाझामधील इस्रायली सैन्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक देशांनी इस्रायलला “दहशतवादी संघटना” म्हणून घोषित केले पाहिजे.
अरबी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, स्वतंत्र बैठकीऐवजी एक बैठक घेण्याचा निर्णय अरब लिगच्या शिष्टमंडळाने अंतिम विधानावर एकमत होण्यात अयशस्वी झाल्यानंतर घेतला. अरब लीग आणि ओआयसी ही ५७ सदस्यीय संघटना असून त्यात इराणचाही समावेश असून या देशांच्या नेत्यांची यापूर्वी स्वतंत्रपणे बैठक होणार होती.
Leaders from Arab and Muslim countries who gathered in Riyadh for a joint Islamic-Arab summit called for an immediate end to military operations in Gaza, declaring that Israel bears responsibility for ‘crimes’ against Palestinians https://t.co/8gBlunbWUi pic.twitter.com/OVXM8WOLJu
— Reuters (@Reuters) November 11, 2023