मुंबई (BJP) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “नमो उत्सवा” ला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सोबतच रविवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आदिवासी पाड्यातही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.
मुंबई भाजपा (BJP) अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून मुंबईत दिवाळी संध्या आणि दिवाळी पहाट हे कार्यक्रम “नमो उत्सव” म्हणून साजरे करण्यात येत असून लालबाग गणेश गल्ली, दहिसर आणि आज वांद्रे पश्चिम येथे झालेल्या नमो उत्सवाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी रंगशारदा येथे पंडित संजीव चिम्मलगी आणि ज्येष्ठ गायिका आरती अंकलिकर -टिकेकर यांची अत्यंत रंगतदार मैफल झाली. अभंग, भाव गीते आणि भक्ती गीतांच्या या मैफलीत “अवघा रंग एक झाला” असा अनुभव श्रोत्यांनी घेतला.
(हेही वाचा Israel-Hamas Conflict: हमासकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर, इस्रायलच्या पंतप्रधानांचे वक्तव्य)
त्यानंतर मुंबई भाजपा (BJP) अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या पुढाकाराने दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला. मुंबई भाजपा, वॉर्ड क्र. १२५ चे महामंत्री संघदीप केदारे यांनी शांतीसागर मित्र मंडळातर्फे घाटकोपर रमाबाई नगर मध्ये ही दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. याही कार्यक्रमाला उपस्थित राहून मुंबई. भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्या.
भाजपा (BJP)तर्फे आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने मागाठणे विधानसभेमधील आदिवासी पाड्यातील कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे आदिवासी कुटुंबांना फराळाचे वाटप करुन त्यांच्या सोबत घरी बसून आमदार अँड आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर यांनी फराळ केला व संवाद साधला. गाणी आणि नृत्य करीत आदिवासी बांधवांच्या आनंदात ते सहभागी झाले.
Join Our WhatsApp Community