गुजराती संत कवी Makarand Dave

181
मकरंद दवे (Makarand Dave) हे सुप्रसिद्ध गुजराती कवी आणि लेखक होते. त्यांना साई मकरंद दवे असे म्हटले जायचे. त्यांचे साहित्य आध्यात्मिक आणि तत्वज्ञान या विषयाला वाहिलेले होते. विशेष म्हणजे त्यांना संत कवी म्हटले जायचे. मकरंद दवे यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९२२ रोजी गोंडल येथे झाला. आता गोंडलाल आपण राजकोट म्हणून ओळखतो. वजेशंकर दवे हे त्यांचे पिता.
गोंडलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते १९४० मध्ये धर्मसिंहजी कॉलेज, राजकोटमध्ये दाखल झाले. त्यांनी १९४२ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या भारत छोडो आंदोलनात भाग घेण्यासाठी शिक्षण सोडले. सुरुवातीच्या आयुष्यात (Makarand Dave) त्यांचे आध्यात्मिक गुरु नाथालाल जोशी यांच्या संपर्कात आले. १९६८ मध्ये त्यांनी लेखिका कुंदनिका कपाडिया यांच्याशी विवाह केला.
त्यानंतर ते मुंबईला गेले. त्यांनी कुमार (१९४४-४५), उर्मी नवरचना (१९४६), संगम, परमार्थी मासिके आणि जय हिंद दैनिकाचे संपादक म्हणून काम केले. गुजरातीशिवाय त्यांनी इंग्रजी पुस्तकांचे लेखक देखील केले. प्रोमिथियस: दि लिव्हिंग फेम ऑफ लव्ह, शिवा: दि लाइट ऑफ लाइट्स, होमेज टू मदर लिबर्टी, इमोर्टल फेस ऑफ अमेरिका ही इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.
१८ वर्षे त्यांनी नंदिग्राम येथे घालवली. तिथे त्यांनी वनवासी व दीनदुबळ्यांसाठी कार्य केले. पुढे ते वलसाडमधील धरमपूर येथे स्थायिक झाले आणि शेवटची २० वर्षे त्यांनी धरमपूर येथे घालवली. त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी त्यांना रणजितराम सुवर्ण चंद्रक, मघानी पुरस्कार, नरसिंह मेहता पुरस्कार आणि दर्शक पुरस्कार मिळाले आहेत. सुरज कडच उगे, गोराज, संगती, संज्ञा हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह आहेत. भजन रस, शिच महिमा स्तोत्र, चिंदानंद, पीड परायी अशी अध्यात्मिक पुस्तके देखील त्यांनी लिहिली आहेत. ३१ जानेवारी २००५ रोजी ते हे जग सोडून निघून गेले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.