लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात (Share Market ) मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांकडून खरेदीला जोर आला. त्यामुळे खरेदीदारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. सेन्सेक्सने ३५० अंकांनी उसळी घेतली आहे. बाजाराच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स किती वधारला पाहूया.
बाजाराला ट्रेडिंग मुहूर्तावर सुरुवात होताच निर्देशांकाने उसळी घेतली. प्री-ओपन सत्रानंतर मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्स सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरू झाला, तर निफ्टीही १०० हून अधिक अंकांच्या वाढीसह १९,५०० ची पातळी ओलांडत सुरू झाला. एका तासाच्या मुहूर्ताच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या वर्षी वाढीसह बंद झाले.
(हेही वाचा – BJP च्या नमो उत्सवाला प्रचंड प्रतिसाद; मुंबई भाजपाची आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी)
सायंकाळी सव्वा सात वाजता व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स ३५४.७७ अंकांच्या म्हणजेच ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह ६५,२५९.४५ वर बंद झाला, तर निफ्टी १००.२० अंकांच्या म्हणजेच ०.५२ टक्क्यांच्या वाढीसह १९,५२५.५५ वर बंद झाला.
टाटा मोटर्स, कोल इंडिया, यूपीएल, इन्फोसीस, ओएनजीसी यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. बँकिंग शेअर्समध्येही वाढ झाली आणि एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी भरपूर कमाई केली. त्यामुळे २०२३ साली बाजारात चांगली वाढ झाली.