गजानन माधव ‘मुक्तिबोध’ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील श्यौपूर शहरात झाला. मुक्तिबोध यांच्या वडिलांचे नाव माधवराव मुक्तिबोध आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. मुक्तिबोध यांचे वडील माधवराव मध्य प्रदेश पोलिसात नोकरीला होते. (Gajanan Madhav Muktibodh)
मुक्तिबोध यांचे पूर्वज महाराष्ट्रातील जळगावचे रहिवासी होते. गजानन माधव मुक्तिबोध यांचे आजोबा वासुदेवजी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सोडून ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे स्थायिक झाले होते. मुक्तिबोध यांच्या आजोबांचे नाव गोपाळराव वासुदेव. ते टोंक जिल्ह्यात कार्यालयीन अधीक्षक होते.
मुक्तिबोध यांचे वडील माधवराव मुक्तिबोध हे कर्तव्यदक्ष व न्यायी होते. ते लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ हे वृत्तपत्र वाचत. गजानन मुक्तिबोध यांनी बी.ए. ची परीक्षा १९३८ मध्ये उत्तीर्ण केली. १९५४ मध्ये त्यांनी ए.ए. ची पदवी प्राप्त केली. नंतर ते शाळेत शिकवू लागले. १९५८ मध्ये रे राजनांद गावात दिग्विजय कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९४२ साली त्यांनी ’मध्य भारत प्रगतिशील लेख संघ’ची स्थापना केली. १९४५ मध्ये ’हंस पत्रिका’च्या संपादकीय विभागात त्यांनी काम केलं.
(हेही वाचा : शीख संस्थानांचे Maharaja Ranjit Singh यांचा इतिहास)
त्यांनी लिहिलेले कविता संग्रह– चांद का मुंह टेढ़ा, भूरी भूरी खाक धूल. कथा संग्रह– काठ का सपना, सतह से उठता आदमी. समीक्षणात्मक संग्रह– कामायनी: एक पुनर्विचार, नए साहित्य का सौंदर्यशास्त्र, समीक्षा की समस्याएं इ. तसेच निबंध संग्रह– नई कविता का आत्म संघर्ष, एक साहित्यिक डायरी इत्यादी साहित्य रचना त्यांनी केली आहे. १७ फेब्रुवारी १९६४ रोजी गजानन माधव ‘मुक्तिबोध’ यांना पक्षाघाताचा झटका आला. मुक्तिबोध यांच्यावर भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दिल्ली ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. पण ८ महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ११ सप्टेंबर १९६४ रोजी मुक्तिबोध यांचा मृत्यू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community