कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) दोन मार्गावरील मडगाव- कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात १६ आणि १७ नोव्हेंबर असे दोन दिवस अनुक्रमे तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे. (Kokan Railway)
मडगाव- कुमठा विभागात दुरुस्तीचे काम होणार असल्याने दोन (Kokan Railway) गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास १६ नोव्हेंबर रोजी कुमठा स्थानकावर थांबेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. मडगाव जंक्शन मंगळुरू सेंट्रल या गाडीचा १६ नोव्हेंबर रोजीचा प्रवास कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल. परंतु, मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, असे कोकण रेल्वेने (Kokan Railway) कळविले आहे.
(हेही वाचा – Central Railway: आता लोकलमधील विक्रेत्यांना मिळणार अधिकृत परवाने, मध्य रेल्वेचा निर्णय)
काही गाड्यांच्या वेळेचे नियमन
राजापूर रोड-सिंधुदुर्ग (Kokan Railway) विभागादरम्यान मडगाव जंक्शन- सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड- दिवा एक्स्प्रेस या दोन गाड्यांचे वेळापत्रक पुनरर्चित केले आहे. या गाड्या अनुक्रमे ८० मिनिटे, २ तास ५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबई सीएसएमटी (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. (Kokan Railway)
(हेही वाचा – Air Pollution : मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, सकाळ पासून रात्री पर्यंत धामधुडूम सुरूच)
मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी रोखून धरला जाईल. (Kokan Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community