Ind vs NZ : विश्वचषकाचा उपान्त्य सामना पावसात वाहून गेला तर अंतिम फेरीत कोण जाणार? 

उपान्त्य फेरीचे दोन सामने आता अनुक्रमे १५ नोव्हेंबर (मुंबई) आणि १६ नोव्हेंबर (कोलकाता) ला होणार आहेत. या सामन्यांत पाऊस पडला तर नेमकं काय होईल? आयसीसीचा नियम काय सांगतो? 

138
Ind vs NZ : विश्वचषकाचा उपान्त्य सामना पावसात वाहून गेला तर अंतिम फेरीत कोण जाणार? 
Ind vs NZ : विश्वचषकाचा उपान्त्य सामना पावसात वाहून गेला तर अंतिम फेरीत कोण जाणार? 

ऋजुता लुकतुके

भारत आणि नेदरलँड्स (Ind vs NZ) दरम्यानचा रविवारचा सामना हा या विश्वचषक स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना होता. भारताने १६० धावांनी विजय मिळवत आपलं अव्वल स्थान कायम राखलं. तर नेदरलँड्‌सचा संघ हा गुणतालिकेत तळाच्या क्रमांकावर राहिला.

स्पर्धेतील उपान्त्य फेरीचे दोन सामने यापूर्वीच ठरले आहेत. १५ नोव्हेंबरला मुंबईत भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने येतील. तर १६ तारखेला दुसरी उपान्त्य लढत कोलकाता इथं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होईल. गुणतालिकेत भारत (९ सामन्यांतून १८ गुण), दक्षिण आफ्रिका (१४), ऑस्ट्रेलिया (१२) आणि न्यूझीलंड (१०) हे चार संघ अव्वल ठरले आहेत.

भारतात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस होतोय. आणि यापूर्वीही विश्वचषकातील काही सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. अशावेळी उपान्त्य सामन्यांमध्ये व्यत्यय आणला तर नेमकं काय होणार? कुठला संघ अंतिम फेरीत जाणार, हे समजून घेऊया…

(हेही वाचा –Kokan Railway : ‘या’ दोन दिवशी असणार मेगाब्लॉक)

विश्वचषक स्पर्धेसाठी पावसाचा नियम

उपान्त्य सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी किमान आवश्यक षटकं (Ind vs NZ) झाली नाहीत तर संपूर्ण सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. पावसाचा थोडाफार व्यत्यय आला तर डकवर्थ – लुईस नियम इथंही लागू होईल. आणि संघांना सुधारित आव्हान देण्यात येईल.

पण, पावसामुळे निकालासाठी आवश्यक षटकंही होऊ शकली नाहीत. आणि दोन्ही दिवस वाया गेले तर या विश्वचषकाची नियमावली असं सांगते की, गुणतालिकेत पुढे असलेला संघ अंतिम फेरीत जाईल. साखळी सामन्यांतील गुण समसमान असतील तर सरस रनरेटच्या आधारे अंतिम फेरीत जाणारा संघ ठरवला जाईल.

भारतीय संघाने साखळी सामन्यांतील (Ind vs NZ) सर्वच्या सर्व म्हणजे ९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे अशी वेळ आलीच तर या नियमाचा फायदा भारताला मिळू शकेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.