लुधियाना मधील खन्ना येथे १००वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पंजाबमधील खन्ना येथे धुक्यामुळे सुमारे १०० वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अमृतसर -दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.या अपघाता सुमारे १२जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. (Road Accident)
पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुमारे २०ते २५ किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. अनेक वाहनांची मोडतोड झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.
(हेही वाचा : GMail Account : जर तुम्ही बरेच दिवस तुमचे मेल तपासले नसतील तर… गुगलने घेतला मोठा निर्णय)
मोठी वाहतूक कोंडी
मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा : Weather Update : राज्यात पुढील २४ तासांत ‘या जिल्ह्यात’अवकाळी बरसणार)