Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी

193
Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir Diwali) शारदा मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. राज्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथे असलेले शारदा मंदिर एलओसीला लागून आहे. या मंदिरात 75 वर्षात पहिल्यांदाच दिवळीची पूजा करण्यात आल्याची माहिती ‘सेव्ह शारदा कमिटी’चे संस्थापक रवींद्र पंडिता यांनी दिली.

शारदा मंदिरात (Jammu Kashmir Diwali) दिवाळीच्या निमित्त आयोजित पूजेला 104-विजय शक्ती ब्रिगेडचे कमांडर कुमार दास आणि सेव्ह शारदा समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता उपस्थित होते.यावेळी त्रिभोणी गावातील स्थानिक लोक आणि शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(हेही वाचा – Ayodhya Diwali 2023 : दिपोत्सवाचे फोटो शेअर करत पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!)

सत्यनारायणाची पूजा (Jammu Kashmir Diwali) करून उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली. याप्रसंगी स्थानिक तहसीलदार तंगधर इयाद कादरी, डॉ.संदीप मावा, शारदा समिती सदस्य एजाज खान, इफ्तिखार, निवृत्त कॅप्टन इलियास, हमीद मीर व त्रिभोणीचे शिख उपस्थित होते.

(हेही वाचा – Diwali 2023 : तुम्हाला माहित आहे का दिवाळीत किल्ला का बनवला जातो?)

देशाच्या फाळणीपूर्वी येथे एक मंदिर आणि गुरुद्वारा होता, जिथे 1947 पर्यंत दिवाळी (Jammu Kashmir Diwali) साजरी केली जात होती. त्यानंतर जिहादींनी मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ला करून ते जाळले. त्यानंतर तिथे पुन्हा कधीच दिवाळी साजरी झाली नाही, पण आता तब्बल 75 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. डिसेंबर 2021 मध्ये या भूमीवर पारंपारिक पूजा करण्यात आली. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा शारदा समितीने मंदिर बांधकाम समिती स्थापन केली. या समितीत तीन स्थानिक मुस्लिम, एक शीख आणि एक काश्मिरी पंडित यांचा समावेश होता. (Jammu Kashmir Diwali)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.