यावर्षी बुधवारी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व- पश्चिम उपनगरे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे) तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैराणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली स्थानक, सीबीडी बेलापूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या विविध बसमार्गावर बेस्ट उपक्रमाच्या वतीने एकूण १४५ जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार यात वाढ करण्यात येईल, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (BEST)
(हेही वाचा – Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी)
प्रवाशांच्या मदतीकरिता जास्त गर्दीच्या बसथांब्यांवर तसेच रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकांवर बसनिरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या अतिरिक्त बसगाड्यांची नोंद घेऊन उपलब्ध केलेल्या जादा बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले. या अतिरिक्त बस सेवेमुळे रेल्वेतील गर्दीतील प्रवास टाळून आपल्या कुटुंबासह फिरून या सणाचा आनंद लुटता येईल. (BEST)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community