Dating App Scam : पुण्यातील एका तरुणाची २२,००० रुपयांना फसवणूक

पुण्यात एका तरुणाची डेटिंग ॲपवर फसवणूक झाली आहे. एका तरुणीने महागड्या वस्तू मागवल्या आणि तरुणाला त्याचं बिल भरायला भाग पाडलं.

147
Dating App Scam : पुण्यातील एका तरुणाची २२,००० रुपयांना फसवणूक
Dating App Scam : पुण्यातील एका तरुणाची २२,००० रुपयांना फसवणूक
  • ऋजुता लुकतुके

पुण्यात एका तरुणाची डेटिंग ॲपवर फसवणूक झाली आहे. एका तरुणीने महागड्या वस्तू मागवल्या आणि तरुणाला त्याचं बिल भरायला भाग पाडलं. (Dating App Scam)

ऑनलाईन तसंच ॲपवर होणाऱ्या फसवणुकीविषयी आपण नेहमी ऐकत असतो. असाच एक प्रकार पुण्यात घडलाय. एका तरुणाची बंबल या डेटिंग ॲपवर फसवणूक झाली आहे. त्याला २२,००० रुपयांचा भूर्दंड बसला. लोकांनी यातून धडा घ्यावा यासाठी आपल्यासोबत जे घडलं ते या तरुणाने ट्विटर या सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं आहे. त्यावरून हे प्रकरण समजलं. (Dating App Scam)

बंबल ॲपवर ३० सप्टेंबर रोजी या तरुणाला एका तरुणीने संपर्क केला. त्याने ठरल्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये भूगाव इथं असलेल्या जिप्सी रेस्ट्रो बारमध्ये या तरुणीची भेट घेतली. पहिल्याच भेटीत तरुणीने हुक्का आणि वाईन ऑर्डर केली. तेव्हा तरुणाला नेमकं किती बिल होईल याची काहीही कल्पना नव्हती. तरुणाने काही चौकशी करण्यापूर्वीच वेटरही ऑर्डर घेऊन निघून गेला. (Dating App Scam)

आणि जेव्हा बिल आलं तेव्हा एक हुक्का १०,००० रुपयांचा होता. वाईनची बाटली १५,००० रुपयांची आणि वाईन ग्लास १,५०० रुपये. बिलावर एकूण रक्कम २२,००० रु अशी छापलेली होती. तरुणीने त्याला बिल भरण्यासाठी धमकावलंही. (Dating App Scam)

‘हे बिल भरलं नाही तर रेस्त्रो बारचा मालक गाडीची नासधूस करेल,’ असं तरुणीने धमकावल्याचं तरुणाने ट्विटरवर लिहिलं आहे. बिल भरलं नाही तर गाडीच्या नासधुसीबरोबरच आरटीओकडून पत्ता घेऊन घरी बिल वसूल करण्यासाठी येऊ असंही या तरुणीने सांगितलं. (Dating App Scam)

या ट्विटमध्ये पोलिसांना फक्त टॅग केलंय. पण, अधिकृत तक्रार केल्याचं म्हटलं नाहीए. पण, ट्विटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे आणि यात पब मालकांचीच मिलीभगत असल्याचा दावा अनेकांनी केलाय. या कामासाठी तरुणी कामावर ठेवत असल्याचं एका व्यक्तीने म्हटलंय. (Dating App Scam)

(हेही वाचा – Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते आता देणार नितीश कुमारांना आव्हान)

‘ती तरुणी बार मालकाकडेच कामाला असली पाहिजे. हल्ली हे वारंवार व्हायला लागलं आहे. बार मालक तरुणींचा वापर करून बंबल ॲपवरंच तरुणांना गाठतात. भेटीसाठी तरुणींकरवी आपल्या बारमध्ये बोलावतात आणि भलीमोठ्ठी बिलं भरायला लावतात,’ असं या व्यक्तीने लिहिलं आहे. फक्त पुण्यातच नाही तर नवी दिल्लीतही अलीकडेच असं एक प्रकरण समोर आलं होतं आणि ते ही बंबल ॲपवरचंच होतं. (Dating App Scam)

अशा तरुणी अनेकदा बंबल वरील आपलं प्रोफाईलही त्वरित बंद करतात आणि फोनवरही उपलब्ध होत नाहीत, असा मुलांचा अनुभव आहे. पुणे पोलिसांनी वरील प्रकरणाचा कुठलाही खुलासा केलेला नाही. (Dating App Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.