मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार ऐन भरात आला असताना राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस प्रणित INDI आघाडीची बिघाडीला सुरुवात झाली आहे. प्रादेशिक पक्षांची नवीन स्वतंत्र PDA नावाने तिसरी आघाडी सुरु करण्याची तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
काहीही करून राहुल गांधींचाच चेहरा काँग्रेस पुढे आणणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची परिणामकारकरीत्या टक्कर घेता येणार नाही याची जाणीव झाल्यामुळेच अखिलेश, नितीश आणि ममता यांनी स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेऊन PDA अर्थात पिछडा, दलित आणि आदिवासी अशी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. पण त्या पलीकडे जाऊन यातले एक राजकीय इंगित देखील समोर येत आहे, ते म्हणजे मूळातच काँग्रेसला विशेषत: गांधी परिवाराला निवडणुकीच्या राजकारणातून पूर्णपणे उखडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वतंत्र डील करून हे नेते INDI आघाडीत फूट पाडून त्या अंतर्गत किंवा त्या बाहेर PDA अर्थात पिछडा, दलित, आदिवासी अशी आघाडी तयार करण्याच्या बेतात असल्याचे समजते.
(हेही वाचा Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)
काँग्रेसपासून नितीश कुमारांचे अंतर
जातनिहाय जनगणनेचा प्रादेशिक पक्षांचा मुद्दा राहुल गांधींनी आपल्या बाजूने वळवून घेतला. तो काँग्रेसचा मुद्दा बनवल्यावर प्रादेशिक पक्षांचा राजकीय मुद्दा हातचा गेला. त्यामुळेच नितेश कुमार यांनी चतुराईने बिहारमध्ये विविध प्रकारचे आरक्षण वाढवून ते 65 टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवले. त्यासाठी जात सर्वेक्षण केले. आता त्याचा लाभ फक्त आपल्याच पक्षाला व्हावा, या इराद्यापोटी नीतीश कुमार देखील काँग्रेसला छुपा विरोध करत आहेत. बिहार, उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेस नगण्य झाली असताना तिला पुनरुज्जीवन मिळणे हे अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसपासून स्वतःचे अंतर वाढविले आहे. INDI आघाडीचा फायदा तसाही काँग्रेसलाच होणार आहे, मग आपल्याला त्यातून काय लाभ??, असा रास्त विचार त्यांनी केला आहे आणि म्हणूनच काँग्रेस पासून फटकून राहत स्वतंत्र PDA अर्थात पिछडा, दलित आणि आदिवासी आघाडी काढण्याचे त्यांनी ठरविले आहे.
ममताही वाट बदलणार
ममता बॅनर्जींचे तीन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आतमध्ये आहेत आणि अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुचिरा बॅनर्जी तुरुंगाच्या वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या धोक्याच्या कक्षेत येऊ इच्छित नाहीत. आपण मोदीं विरोधात किती आवाज वाढवला तरी विशिष्ट मर्यादेपलिकडे तो परिणामकारक ठरत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे.
Join Our WhatsApp Community