सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही देशाची राजधानी दिल्लीत दिवाळीच्या रात्री जोरदार आतिषबाजी झाली. यामुळे दिल्लीची हवा (Air Pollution) पुन्हा एकदा विषारी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पाउसामुळे देशाची राजधानी दिल्लीतील हवा (Air Pollution) थोडी स्वच्छ झाली होती. वातावरणात पारदर्शकता आली होती आणि श्वास घेताना त्रास होत नव्हता.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे तमाम आदेशांना बगल देत दिल्लीकरांनी (Air Pollution) दिवाळीच्या दिवशी खूप आतिषबाजी केली. यामुळे हवा विषारी झाली आहे.
(हेही वाचा – World Diabetes Day ची सुरुवात कधी झाली?)
तर दुसरीकडे मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडची हवा अतिवाईट झाली आहे. मुंबईतील (Air Pollution) दूषित हवेचा निर्देशांक एवढा वाढला आहे की, या हवेतील धुळीच्या प्रदूषणामुळे दमा, अस्थमा यांसारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. त्यासोबत सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजारही वाढू लागले आहेत.
मुंबईकरांना आता शुद्ध हवा घेण्याची सोयच राहिलेली नाही. हवेतील दमटपणा (Air Pollution) आणि त्यातच हवेत मिसळणारा धूर आणि धूळ ! लोकांना ऑक्सिजन टँक सोबत घेऊन फिरण्याची तर वेळ येणार नाही ना, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
(हेही वाचा – Weather Update : राज्यासह देशात पुन्हा पावसाची शक्यता)
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची (Air Pollution) आतषबाजी झाल्यामुळे या शहरांमधील हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ श्रेणीत गेली. देशात राजधानी दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. राज्याच्या राजधानी व उपराजधानीतही न्यायालयाचे आदेश डावलून आतषबाजी झाल्यामुळे हवेची पातळी कमालीची खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community