India – Canada Crisis : ‘कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले जाऊ नये’; भारताचे कॅनडाला चोख प्रत्युत्तर

195
India - Canada Crisis : 'कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले जाऊ नये'; भारताचे कॅनडाला चोख प्रत्युत्तर

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडा (India – Canada Crisis) यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भाजपवर आरोप केले. याला संयुक्त राष्ट्र संघात प्रत्युत्तर देताना चांगलाच आरसा दाखवल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या (India – Canada Crisis) सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे अप्रत्यक्षरित्या ट्रुडो यांनी भारताला सुनावले होते.

यावर भारताने संयुक्त राष्ट्र संघात प्रत्युत्तर दिले. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये कॅनडाला (India – Canada Crisis) प्रार्थनास्थळे आणि द्वेषयुक्त गुन्हे रोखण्याचा सल्ला दिला. भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील मुत्सद्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत ठरावावरील चर्चेत कॅनडाला काही सल्ला दिला.

(हेही वाचा – Mahadev Betting App : डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टरवर गुन्हा दाखल)

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत मोहम्मद हुसेन म्हणाले, “भारताचा कॅनडाला (India – Canada Crisis) सल्ला आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये म्हणून देशांतर्गत संरचना बळकट कराव्यात. त्याच वेळी, कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले जाऊ नये आणि हिंसाचार उफाळून येऊ नये. कॅनडातील प्रार्थनास्थळे, धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्लेही थांबवले पाहिजेत. द्वेषयुक्त गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणे रोखण्यासाठी कायदे बळकट केले पाहिजेत.

बांगलादेशचे मुत्सद्दी अब्दुल्ला अल फोरहाद म्हणाले की, “कॅनडाने वर्णभेद, द्वेषयुक्त गुन्हे (India – Canada Crisis) आणि स्थलांतरित आणि मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. बांगलादेशने कॅनडाला कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा सल्ला दिला आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.