Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण

268

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी दीपावलीतही अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील गुहा गावामधील श्री कानिफनाथ समाधी मंदिरात हिंदू पुजारी पूजा करत होते, त्यानंतर त्याठिकाणी भजनी मंडळ भजन करू लागले. काही वेळाने मात्र त्या ठिकाणी धर्मांध मुसलमानांची (Muslim) झुंड आली, त्यामध्ये वयोवृद्ध, तरुण आणि महिलांचा समावेश होता, या सगळ्यांनी भजन बंद करून निघून जाण्यासाठी भजनी मंडळाला सांगू लागले, ही मशीद आहे, इथे हे चालणार नाही, असे सांगत काही वेळातच या धर्मांध मुसलमानांकडून (Muslim) तेथील ३-४ हिंदूंना जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जमावाने हातात काठ्या आणि कोयते आणले होते. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात मंदिराचे पुजारी शंकर मांजरे यांनी एफआयआर दाखल केला, त्याच वेळी धर्मांध मुसलमानांनीही हिंदूंच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

तक्रारदार शंकर किसन मांजरे हे श्री कानिफनाथ समाधी मंदीराचे पुजारी आहेत. ते त्यांची पत्नी यशोदा, मुलगा लक्ष्मण, सुन उज्वला, नातवंडे यश, तनुश व कल्याणी असे तिथे एकत्र राहत आहेत. मांजरे हे रोज सकाळी व रोज सायंकाळी या मंदिरात  पुजा करतात. सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी मांजरे हे सकाळी 07.15 वा सुमारास मी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. त्यानंतर दुसरे पुजारी अरुण पांडुरंग लांबे हे व गावातील ४ सदस्य असलेले भजनी मंडळ आले. त्यांनी भजन चालु केले. त्यानंतर तेथे सुमारे 07.30 वाजता ७ मुसलमान आले आणि या ठिकाणी तुम्ही भजन करायचे नाही, तुम्ही मंदिरातून बाहेर निघुन जा, असे म्हणू लागले. त्यावर मांजरे यांनी, ‘तुम्ही असे का म्हणता, आज अमावस्या असून परंपरेनुसार नेहमीप्रमाणे आम्ही आरती करणार आहोत. त्यानंतर मात्र मुसलमानांना (Muslim) राग आला आणि त्यांनी या हिंदूंना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

काही वेळाने तेथे ६० हुन अधिक मुसलमानांची (Muslim) झुंड आली. त्यांनी हातात लाकडी दांडके व कोयते घेतले होते. त्यामाध्यमातून ते हिंदूंना मारहाण करू लागले. तुम्हाला हिंदूंना आम्ही येथे येऊन देणार नाही, तुम्ही येथे आलात तर तुम्हाला एका एकाला कापून टाकू, तू काय वडा-या येथे पूजा करायला येतोस, तू सुध्दा या ठिकाणी पूजा करायला यायचे नाही असे म्हणत या जमावातील जुनेद इसाक शेख, सोहेल गणीभाई शेख, अब्बास लियाकत राज्यद, साहिल लियाकत सय्यद व साबीर गणीभाई शेख यांनी लाकडी काठ्यांनी हिंदूंना मारहाण केली. त्यावेळी शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि अंतर्गत कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.