Marin Drive आणि Flora Fountain परिसराचा लवकर होणार कायापालट

203

पुरातन वास्तू वारसा क्षेत्रात मोडणाऱ्या मरीन ड्राईव्ह (Marin Drive) येथील  रस्त्यांचे तसेच सार्वजनिक जागांसह फ्लोरा फाऊंटन (Flora Fountain) ते एशियाटिक लायब्ररीपर्यंतच्या भागाचे हेरिटेजचा दर्जा राखून विकास करण्यात येणार आहे. या भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाऊंटन (Flora Fountain) ते एशियाटिक लायब्ररी हा परिसर पुरातन वास्तू वारसा क्षेत्रात मोडत असून या परिसरातील रस्त्यांचे आणि सार्वजनिक खुल्या जागांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच मरीन ड्राईव्ह (Marin Drive) या परिसरातील रस्त्यांसह सार्वजनिक जागांचा विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही जागा पुरातन वास्तू वारसा क्षेत्रात मोडत असल्याने याच्या पुरातन वास्तूचा दर्जा कायम राखून याचा विकास करण्यासाठी या प्रकारची कामे करणाऱ्या सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिकेच्यातवीने ब्रिक डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागारामार्फत आरखडा बनवून त्यानुसार या भागातील सर्व रस्ते आणि सार्वजनिक जागांचा विकास हा हेरिटेज दर्जा कायम राखून केला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यानंनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.