मुंबई महापालिकेच्यावतीने सर्वसामान्य जनतेला घराशेजारी सर्व प्रकारचे आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्यावतीने आपला दवाखाना सुरु करण्यात आला असून आतापर्यंत १९४ आपला दवाखाना (Aapla Dawakhana) सुरु करण्यात आले आहेत. यापैकी ५० दवाखान्यामध्ये नाक, कान अणि घसा यांचीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे नाक-कान आणि घशाच्या आजारांबाबत मोठ्या रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुगणांना आता घराशेजारीच आपला दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत महापालिकेच्यावतीने ५० दवाखान्यांमध्ये अद्ययावत पॉलिक्लिनिक अर्थात कान-नाक-घसा, डोळे आणि डेंटल ओपीडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० आपला दवाखान्यामध्ये (Aapla Dawakhana) कान-नाक-घसा अर्थात ईएनटीची ओपडी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या ईएनटी ओपीडीकरता या ५० दवाखान्यांमध्ये १५ प्रकारची उपकरणे खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. यासाठी तीन कंपन्यांकडून विविध प्रकारची उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)
या उपकरणांच्या खरेदीसाठी श्रध्दा डिस्ट्रीब्युटर्स, कालिंदी एंटरप्रायझेस आणि मोबॅलिटी ग्लोबल आयएनसी या तीन कंपन्यांची निवड करण्यात आली असून त्यांना अनुक्रमे १७.६५ लाख रुपये, १.१६ कोटी रुपये, १.११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वी नेत्र चिकित्सा आणि दंत चिकित्सा यांची सुविधा दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.
Join Our WhatsApp Community