IND vs NZ Semi Final : भारतीय संघातून मोहम्मद सिराज खेळणार नाही, कोण आहे बदली खेळाडू?

189

IND vs NZ Semi Final साठी आता भारतीय संघ सज्ज झाला आहे. पण या महत्वाच्या सामन्यासाठी आता भारतीय संघात एकमेव मोठा बदल होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा खेळणार नाही, त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू खेळणार आहे.

भारत हा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत पोहचू शकणार आहे, पण हा सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. भारतापुढे सेमी फायनलमध्ये (IND vs NZ Semi Final)चे आव्हान आहे ते न्यूझीलंडच्या संघाचे. यापूर्वी २०१९ साली झालेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे त्यावेळी केलेल्या चुका भारताला यावेळी करायच्या नाहीत.
या सेमी फायनल  (IND vs NZ Semi Final)साठी भारतीय संघात एक मोठा बदल होणार असल्याचे आता समोर येत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन असते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या सामन्यासाठी फलंदाजीवर भारतीय संघ जोर देणार आहे. यापूर्वी नेदलरलँड्सच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाली होती. झेल पकडताना चेंडू त्याच्या गळ्यावर आदळला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे आता या सामन्यात सिराज खेळणार नसल्याचे दिसत आहे. पण सिराजच्या जागी आता कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे होता. भारताकडे यासाठी दोन पर्याय होते. पहिला म्हणजे आर.अश्विन. जो आतापर्यंत फक्त एकच सामना या वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. दुसरा पर्याय म्हणजे शार्दुल ठाकूर. हे दोघेही चांगली फलंदाजी करू शकतात. त्यामुळे या दोघांपैकी भारताला एकालाच निवडावे लागणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी अश्विनची संघात निवड होईल, असे समजते आहे. कारण अश्विनला मोठ्या सामन्यांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे या सामन्यात सिराजच्या जागी अश्विन भारतीय संघात दिसू शकतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.