गुजराती साहित्यिक Ravji Patel

306
रावजी पटेल (Ravji Patel) हे गुजराती भाषेतील आधुनिक कवी, कथा लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भाटपूर गावात १५ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. भाटपूर आता आनंद जिल्ह्यात येते. त्यांचे कुटुंब खेडा जिल्ह्यातील वल्लवपुरा गावचे मूळ रहिवासी होते. रावजी पटेल यांनी गुजरतई साहित्याला नवे वळण दिले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण वल्लवपुरा या गावात झाले आणि पुढील शिक्षणासाठी ते अहमदाबादला गेले. त्यांनी नवचेतन हायस्कूल, अहमदाबाद येथून एस.एस.सी. पूर्ण केली. नंतर ते सिटी आर्ट्स कॉलेजमध्ये दाखल झाले. पण दुर्दैव असे की त्यांना घरच्या परिस्थितीमुळे आणि ओढवलेल्या आर्थिक संकटांमुळे दुसर्‍या वर्षात कॉलेज सोदावे लागले.
त्यांनी सुरुवातीला गिरणीमध्ये काम केले. नंतर ग्रंथालये, वर्तमानपत्रे, विद्यापीठे अशा विविध ठिकाणी काम केले. त्यांचा ’अंगत’ हा काव्य संग्रह १९७० रोजी त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. यामध्ये चौदा गाण्यांचा समावेश आहे. ’मारी आंखे कंकुना सूरज अथम्य’ हे त्यांचे गीत गुजरातमधील उत्कृष्ट गीत मानले जाते. हे गीत अत्यंत आधुनिक असल्याचे म्हटले जाते.
तसेच त्यांनी मुकुंद पारीख यांच्यासोबत ’शब्द’ या कविता नियतकालिकाचे सहसंपादन केले. अश्रुधर, झांझा ह्या त्यांच्या दोन कादंबर्‍या असून वत्ती अने वार्ता हा कथा संग्रह आहे. रख पण बोले छे ही त्यांची एकांकिका कती मासिकाच्या तिसर्‍या अंकात प्रकाशित झाली होती. २०१८ मध्ये गुजराती विश्वकोश ट्रस्टने मणिलाल एच. पटेल यांनी लिहिलेले ’मोल भरेलू खेतर’ नावाचे त्यांचे चरित्र प्रकाशित केले होते. अमीरगड आणि आनंद येथे काही महिने राहिल्यानंतर क्षयरोग आणि मानसिक विकारांमुळे १० ऑगस्ट १९६८ रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.