World Cup Semifinal : डेव्हिड बेकहम ते सचिन तेंडुलकर…कोण, कोण हजेरी लावणार उपान्त्य सामन्याला?

246

भारत वि न्यूझीलंड सामना बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. विश्वचषक स्पर्धेचा (World Cup Semifinal) अंतिम टप्पा या महिन्यात सुरू होतोय. आणि ही असणार आहे स्पर्धेची बाद फेरी.

आतापर्यंतचे ९ पैकी ९ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल होता. आता त्यांचा मुकाबला तालिकेतील चौथ्या आणि आयसीसी क्रमवारीतील पाचव्या संघाशी होणार आहे. आणि विश्वचषकातील हा सामना पाहण्यासाठी भारतातील तसंच जगभरातील सेलिब्रिटी मुंबईत हजेरी लावणार आहेत.

सामन्यापूर्वी मैदानात विश्वचषकाचा करंडक ठेवण्यात येतो. हा मान आज मुंबईकर सचिन तेंडुलकर बरोबरच मिळेल इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहमला. डेव्हिड बेकहम तीन दिवसांच्या युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून भारतात आहे. आणि उपान्त्य सामन्यासाठी तो जातीने हजर राहणार आहे. इतकंच नाही तर बेकहम सामन्यापूर्वीच्या स्टार वाहिनीच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.

(हेही वाचा Ind vs NZ Preview : भारताला घ्यायचाय २०१९ च्या उपान्त्य लढतीचा बदला)

बॉलिवूडचा शेहनशाह अमिताभ बच्चनला अलीकडेच बीसीसीआयने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमसाठी गोल्डन पास दिला होता. त्यामुळे इथल्या प्रत्येक सामन्यासाठी अमिताभ यांना पॅव्हेलिअनमध्ये मोफत प्रवेश असेल. आणि आजच्या महत्त्त्वाच्या सामन्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय आमीर खान, विंडिज दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स हे सेलिब्रिटीही सामन्याला हजेरी लावणार आहेत.

सुरुवातीला विश्वचषकासाठी लोकांची फारशी गर्दी होत नव्हती. पण, भारताच्या सामन्यांना सुरुवातीपासून गर्दी होती. आणि हळू हळू मैदानावर प्रेक्षकांनीही हजेरी लावायला सुरुवात केली. अहमदाबादला झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात बीसीसीआयने १० लाखाव्या प्रेक्षकाचंही स्वागत केलं. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला.

बुधवारी पहिल्या उपान्त्य सामन्यानंतर (World Cup Semifinal) दुसरा उपान्त्य सामना गुरुवारी १६ नोव्हेंबरला कोलकाता इथं होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ एकमेकांना भिडतील. आणि या दोन सामन्यातील विजेते संघ १९ नोव्हेंबरला रविवारी अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात आमने सामने असतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.