World Cup Semi-final : महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ कशी करतो तयारी; जाणून घ्या

134

भारत आणि न्यूझीलंड (World Cup Semi-final) दरम्यानचा साखळी सामना धरमशाला इथं हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला होता. तोपर्यंत हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल होते. आणि ती वर्चस्वाची लढाई मानली जात होती. त्यामुळे सामन्याचं दडपण मोठं होतं.

अखेर विराट कोहलीच्या ९५ धावा आणि रोहीत शर्मा, रवी जाडेजा यांनी त्याला दिलेली साथ यामुळे भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला. तोपर्यंत भारतीय संघाचा कार्यक्रम थकवणारा होता. आणि पहिल्या तीन सामन्यांसाठी त्यांनी भरपूर प्रवास केला होता.

आता तगड्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरच्या सामन्यानंतर मात्र कर्णधार रोहीत शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक गोष्ट केली. दोन दिवस संघ धरमशालातच थांबला. आणि तिथे संघाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी चक्क एक फॅशन शो भरवला. खेळाडूंनी याला जोरदार प्रतिसाद दिला हे वेगळं सांगायला नको. फॅशन शो बरोबरच इतरही खेळाडूंना एकत्र आणणारे कार्यक्रम झाले. आणि खेळाडू त्यामुळे एकत्र आले.

‘सामन्याचा निकाल काहीही लागो, आम्ही संघातील वातावरण बदलू देत नाही, हे आम्ही अगदी कटाक्षाने पाळलंय. खेळाडूंनी सतत एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही धरमशालाला फॅशन शोही घेतला. सगळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ रँम्पवर चालले. सगळ्यांना मजा आली. हे सगळं आम्ही ठरवून केलं,’ कर्णधार रोहीत शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना सांगितलं.

(हेही वाचा World Cup Semifinal : डेव्हिड बेकहम ते सचिन तेंडुलकर…कोण, कोण हजेरी लावणार उपान्त्य सामन्याला?)

एकादा खेळाडू जरी दडपणाखाली असेल तर संघाबरोबर दडपण वागवलं जातं. आणि खेळाडू जिथं जातील तिथे ते त्यांच्याबरोबर राहतं. ही गोष्ट टाळण्याचा भारतीय संघ प्रशासनाचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच दिवाळी साजरी करणं असो किंवा इतर कुठलीही टिम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी, त्याचा संघाला फायदा झालेला दिसतोय.

‘आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली , ती म्हणजे या गोष्टी मीडियापासून लपवून ठेवली. त्यामुळे ती संघातच राहिली. आणि याचाही फायदाच झाला,’ असं रोहीत आवर्जून म्हणाला. पहिल्या दोन सामन्यांनंतर भारतीय संघ प्रशासनाने खेळाडूंच्या सरावा दरम्यानही मीडियाला उपस्थित राहण्याासाठी परवानगी नाकारली.

एखाद्या सामन्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूला संघाचा पाठिंबा आवश्यक असतो हे लक्षात घेऊन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मीडिया किंवा बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप टाळून त्यांनी खेळाडूंची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टींचा भारतीय संघाला आतापर्यंत फायदा झालाय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.