भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी (IND Vs NZ Semi-Final) बुधवारी, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी होणार आहे. या सामन्याच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच क्रिकेटप्रेमींच्या सुरक्षेसाठी वानखेडे स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१२० पोलीस अधिकारी, ६०० अंमलदार यांच्यासह दंगल नियंत्रण पथके, शीघ्र कृती दल आणि स्ट्रायकिंग फोर्स वानखेडे स्टेडियम तैनात करण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघाची आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीचा (IND Vs NZ Semi-Final) सामना बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी होता आहे. हा सामना पहाण्यासाठी भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमी बुधवारी वानखेडे स्टेडियम या ठिकाणी येणार आहे. या सामन्याची तिकिटांची विक्री पूर्वीच झालेली असल्यामुळे हजारो क्रिकेटप्रेमी या ठिकाणी सामना बघण्यासाठी येणार असल्यामुळे या सामना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केली आहे. १२० पोलीस अधिकारी ६०० अंमलदार यांच्यासह दंगल नियंत्रण पथके, शीघ्र कृती दल आणि स्ट्रायकिंग फोर्स वानखेडे स्टेडियम तैनात करण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
(हेही वाचा World Cup Semifinal : डेव्हिड बेकहम ते सचिन तेंडुलकर…कोण, कोण हजेरी लावणार उपान्त्य सामन्याला?)
मुंढे पुढे म्हणाले की, छेडछाड आणि चोरी सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके काळाबाजार, छेडछाड आणि चोरीसारख्या सामान्य गुन्हेगारीवर लक्ष ठेवतील. आम्ही विशेष पथके तैनात केली आहेत. स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला कोणत्याही बेकायदेशीर फेरीवाल्यांना किंवा कोणत्याही वस्तूंच्या बेकायदेशीर विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, त्यासाठी आम्ही विशेष पथकेही तैनात केली आहेत.
Join Our WhatsApp Community