IND VS NZ Semi-final :  सामन्यादरम्यान वानखेडेत आग लावण्याची धमकी देणारा अटकेत 

150

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध न्यूझीलंड संघामध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीतील IND VS NZ Semi-final  सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होत असताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर धमकी देण्यात आली. या ट्वीटमध्ये बंदुक, ग्रेनेड व काडतुसचे छायाचित्र असून सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि ही धमकी देणारा गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यातील १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.

धमकी देणारा म्हणतो, विराटचा चाहता

देशात सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धा ही अतिम टप्प्यात आली असून १५ नोव्हेंबरला भारत विरुध्द न्युझीलंड या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे. संबंधित ट्वीट मंगळवारी रात्री प्राप्त झाले आहे. या ट्वीटमध्ये छायाचित्र असून त्यात बंदुक, हँडग्रेनेड व काडतुस आहे. या छायाचित्राखाली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांच्या ट्वीटर सेलने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली, त्यानंतर गुन्हे शाखा व इतर विभागांना याबाबत कळवण्यात आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लातूर जिल्ह्यातील १७ वर्षीय तरुण हा स्वतःला विराट कोहलीचा मोठा चाहता समजतो.

(हेही वाचा Virat Kohli to Bowl More? विराट कोहलीने नियमित गोलंदाजी करावी अशी प्रशिक्षक पारस म्हांब्रेंची इच्छा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.