BhauBeej 2023 : राजकीय नेते देखील दंग झाले भाऊबीजेच्या सणात

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपच्या नेते प्रसाद लाड यांच्यासह भाऊबीज साजरी केली.

170
BhauBeej 2023 : राजकीय नेते देखील दंग झाले भाऊबीजेच्या सणात
BhauBeej 2023 : राजकीय नेते देखील दंग झाले भाऊबीजेच्या सणात

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपच्या नेते प्रसाद लाड यांच्यासह भाऊबीज साजरी केली. प्रसाद लाड यांनी चित्रा वाघ यांच्याकडून ओवाळून घेत असताना तुमच्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत अशा शुभेच्छा दिल्या. लवकरच चित्राताई या राज्यातील तसेच देशातील राजकारणात फार पुढे गेलेल्या दिसतील असे भागीतच प्रसाद लाड यांनी वर्तवले. (BhauBeej 2023)

खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षारक्षकांसमवेत साजरी केली भाऊबीज

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सोबत असणाऱ्या वाय प्लस सुरक्षा दर्जाच्या सुरक्षारक्षकांना ओवाळून आपली भाऊबीज साजरी केली. यावेळी नवनीत राणा यांनी आपुलकीने सुरक्षा पुरवणाऱ्या आपल्या सुरक्षारक्षकांबद्दल सहानुभूती दाखवत एखाद्या भावाप्रमाणे ते माझी सुरक्षा करतात त्यामुळे यंदाची भाऊबीज मी आपल्या सुरक्षारक्षकांबरोबर साजरी केल्याचे बोलून दाखवले. (BhauBeej 2023)

भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी आपल्या बहिणीकडे जाऊन भाऊबीज केली साजरी

बहिण संगीता शिंदे यांच्या घरी जात भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी भाऊबीज साजरी करत तू लवकरच आमदार हो अशा हटके शुभेच्छा देखील आपल्या बहिणीला दिल्या. (BhauBeej 2023)

संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते थोरात आणि तांबे यांनी देखील साजरा केला भाऊबीजेचा सण

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली बहीण दुर्गा तांबे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. तर बाळासाहेब थोरात यांच्या कन्येने सत्यजित तांबे यांना ओवाळून भाऊबीजेचा सण साजरा केला. (BhauBeej 2023)

(हेही वाचा – IND VS NZ Semi-Final : वानखेडे स्टेडियम पेटवून देण्याची धमकी देणारा निघाला अल्पवयीन)

रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना ओवाळले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत भाऊबीज साजरी केली. आपले बंधू जयंत पाटील हे आजारी असल्या कारणास्तव त्यांच्या समवेत आज भाऊबीज साजरी न करता आल्याची खंत रूपाली चाकणकर यांनी बोलून दाखवली. (BhauBeej 2023)

तर तिकडे कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना खर्डा भाकर खाऊ घालून भाऊबीज साजरी केली. सरकार ऊस उत्पादकांना चांगला भाव देत नसल्याने यंदाच्या भाऊबीजेला सर्व लोकप्रतिनिधींना कोल्हापुरात खर्डा भाकर खाऊ घालून भाऊबीज साजरी करण्यात आली. (BhauBeej 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.