Rajasthan Assembly Elections : आयारामांमुळे पक्षातील नेत्यांचे टेन्शन वाढले

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यातच राजस्थानमधील वातावरण चांगलेच तापले आहे.

129
Rajasthan Assembly Elections : आयारामांमुळे पक्षातील नेत्यांचे टेन्शन वाढले
Rajasthan Assembly Elections : आयारामांमुळे पक्षातील नेत्यांचे टेन्शन वाढले

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यातच राजस्थानमधील वातावरण चांगलेच तापले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेसने आयारामांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात बंडखोरी झाल्याचे पाहावयास मिळते. मात्र यामुळे पक्षातील जुन्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. यावेळी दोन्ही पक्षांनी आयारामांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील स्वपक्षीय इच्छुक, विद्यमान नेतेमंडळीत नाराजी आहे. त्यातच अनेक मतदारसंघांतून भाजप व काँग्रेसने नातेवाइकांना रिंगणात उतरविल्याने अनेक ठिकाणी नातलग आमने-सामने आल्याने या रंगतदार निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rajasthan Assembly Elections)

काँग्रेसच्या १२ जणांनी बंड पुकारले आहे, तर भाजपच्या आठ जागांवर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या जागांवरती दोन्ही पक्षांना फटका बसणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत शोभा राणी कुशवाहा या १९ हजार मताने विजयी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शिवचरण कुशवाह यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०२३ च्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी पक्ष बदलले आहेत. (Rajasthan Assembly Elections)

(हेही वाचा – Fire : फटाके उडवताना ठाण्यात गुहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहने जळून खाक)

राजस्थानात भाजप, काँग्रेसने एकमेकांविरोधात नातेवाईकांना निवडणूक रिंगणात उतरवत चुरस निर्माण केली आहे. काही ठिकाणी नातेवाईक आमने-सामने आल्याने या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. राजस्थानातील धोलपूर मतदारसंघात भावजी णि मेहुणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजपने शिवचरण कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने शोभा राणी कुशवाहा यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भावजी आणि मेहुणी यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Rajasthan Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.