Naresh Kumar : दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर ८९७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे.

175
Naresh Kumar : दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
Naresh Kumar : दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर ८९७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे ही तक्रार आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दक्षता मंत्री आतिशी यांनी तिन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण करून मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना अहवाल सादर केला. (Naresh Kumar)

दिल्लीच्या मुख्य सचिवांवर ८९७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी एलजींकडे हटवण्याची शिफारस केली होती. यानंतर बुधवारी सीएम केजरीवाल यांनी एलजी व्ही के सक्सेना यांना पत्र लिहून नरेश कुमार यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रासह प्रकरणाचा तपास अहवालही एलजीला पाठवला आहे. केजरीवाल यांनी आतिशी यांना या प्रकरणाचा तपास अहवाल सीबीआय आणि ईडीकडे पाठवण्यास सांगितले. (Naresh Kumar)

(हेही वाचा – Rajasthan Assembly Elections : आयारामांमुळे पक्षातील नेत्यांचे टेन्शन वाढले)

दिल्लीत बांधण्यात आलेल्या द्वारका एक्स्प्रेस-वेसाठी भूसंपादनात अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर आतिशी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तपासादरम्यान आतिशी यांना आढळले की नरेश कुमार यांनी त्यांच्या मुलाशी संबंधित कंपन्यांना ८९७ कोटी रुपयांचा नफा दिला असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. (Naresh Kumar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.