उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि ४२० आहेत, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Nitesh Rane)
शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वैर लपून राहिले नाही. त्यामुळे नितेश राणे यांनी भास्कर जाधव हे चिपळूनचे सोंगाडे आहेत तर संजय राऊत हे भांडूपचे देवानंद आहेत, असा टोला लगावला. (Nitesh Rane)
(हेही वाचा – Shinde Group Protest : मुलुंडमध्ये शिंदे गटाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप अंगलट आले)
राणे म्हणाले, काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने हे सांगावे की, २००४ ते २०१६ पर्यंत राज्यसभेच्या निमिताने तुमच्या अँफिडेव्हीटमध्ये तुमचा वाढदिवस हा १५ एप्रिल १९६१ ला आहे आणि २०१६ ते २०२८ पर्यंत तुम्ही दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात तुमचा वाढदिवस १५ नोव्हेंबर १९६१ ला आहे. तुम्ही नेमकी जन्म तारीख का बदलली? असा सवाल नितेश राणे यांनी राऊत यांना केला. तर ही जन्मतारीख बदलण्यात कुठली ४२० शी आहे, याचे स्पष्टीकरण राज्यातील जनतेला मिळाले पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले. (Nitesh Rane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community