Ind vs NZ : विराट कोहलीचं ५० वं शतक!

विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यांत भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे आणि विराट कोहलीने ५०वं एकदिवसीय शतक पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. 

160
Ind vs NZ : विराट कोहलीचं ५० वं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल
Ind vs NZ : विराट कोहलीचं ५० वं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने ५०वं एकदिवसीय शतक पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. (Ind vs NZ)

विराटने आपल्या २७९व्या डावात आपलं ५०वं शतक साजरं केलं ते १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने. त्याचबरोबर विराटने विश्वचषक स्पर्धेतही १,८०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि तो सचिन तेंडुलकरच्या पाठोपाठ आता दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. अखेर ४४व्या षटकांत विराट कोहली टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. त्याने ११३ चेंडूंमध्ये ११७ धावा केल्या. (Ind vs NZ)

विराटच्या बरोबरच श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आकार दिला. श्रेयस अय्यरने घरच्या मैदानावर पुन्हा एकदा षटकारांची आतषबाजी केली आहे आणि कोहलीबरोबर त्याने दीड शतकी भागिदारीही केलीय. (Ind vs NZ)

(हेही वाचा – Naresh Kumar : दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप)

या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ४५ षटकांच्या आतच ३२० धावसंख्या गाठलीय ती फक्त एक गडी बाद करून. शुभमन गिल दुर्दैवाने ७३ धावांवर दुखापतीमुळे पॅव्हेलिअनमध्ये परतला. थोडक्यात, पुन्हा एकदा या उपांत्य सामन्यात भारतीय फलंदाजीचा डंका दिसून आला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार सुरूवात केली. रोहितने २९ चेंडूत ४७ धावा केल्यावर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत तो बाद झाला. (Ind vs NZ)

किवी गोलंदाजांना हे एकमेव यश मिळवता आलं आहे. रोहित बाद झाल्यावर शुभमनने त्याची जागा घेतली, पण शुभमनच्या ७३ धावा झाल्या असताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि तो उपचारांसाठी पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाला ४००च्या जवळ जाण्याची चांगली संधी आहे. (Ind vs NZ)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.