ShivSena Thackeray Group: शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात, कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गेल्या आठवड्यात हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

119
ShivSena Thackeray Group: शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात, कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ShivSena Thackeray Group: शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात, कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले (ShivSena Thackeray Group) आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

अद्वय हिरे यांच्या रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेतून ७.४६ कोटी कर्ज घेतले होते, सदर कर्जाची रक्कम संस्थेसाठी न वापरता त्या रकमेचा गैरवापर वापर केला म्हणून नाशिक जिल्हा बँकेने हिरे विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर हिरे फरार झाले होते, आज पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं आहे.

(हेही वाचा – Share Market : दिवाळीत शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा? वाचा सविस्तर… )

गेल्या आठवड्यात हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता जिल्हा बँक प्रकरणात त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.