चिपी पारूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळावर (Sindhudurg Airport) नाईट लँडिंगची यंत्रणा बसवण्यात आली आहे. लवकरच या विमानतळावरून नाईट लँडिंग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे, मात्र त्याआधी डीजीसीएच्या (Directorate General of Civil Aviation) परवानगीची अपेक्षा आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
४ डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह दिग्गज व्यक्ती मालवण येथील सिंधुदुर्ग किनाऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यन्वित करण्यात आली आहे. फ्लाय-९ ही विमान कंपनी येथे सेवा देण्यास सज्ज झाली आहे. ही सुविधा सुरू करणे महत्त्वाचे होते. अखेर प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस निर्णय होऊन आवश्यक त्या सुविधा पूर्ण करून घेण्यासाठी विकासक आयआरबी कंपनीला सूचना देण्यात आल्या होत्या.
(हेही वाचा – ShivSena Thackeray Group: शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे नाशिक पोलिसांच्या ताब्यात, कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल )
याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनीसुद्धा याबाबत विमानतळाला भेट देऊन सूचना दिली होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा बसवण्यात आली. लवकरच दिल्ली येथील डीजीसीएचे पथक विमानतळावर येऊन सुविधेची तपासणी करून सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देईल.
हेही पहा –