Uttarkashi Tunnel Accident : तीन दिवस उलटूनही मजूर बोगद्यातच ,अन्य कामगारांची निदर्शनं

यंत्रणांकडे बचावकार्यासाठी पर्यायी नियोजन नसल्याने मजुरांच्या कुटुंबीयांच्या संतापाचा बांध फुटला

161
Uttarkashi Tunnel Accident : तीन दिवस उलटूनही मजूर बोगद्यातच ,अन्य कामगारांची निदर्शनं
Uttarkashi Tunnel Accident : तीन दिवस उलटूनही मजूर बोगद्यातच ,अन्य कामगारांची निदर्शनं

देशभरात दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना उत्तराखंडमध्ये येथील उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधीन बोगद्याचे काम सुरू असल्याने काही भाग कोसळल्याने ४० मजूर आतमध्ये अडकून पडले आहेत.मागील तीन दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या मदतीने खोदकाम करणारे यंत्र आणण्यात आले आहे. या बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांचा संयम संपत आला असून, बुधवारी (१५ नोव्हेंबर ) या कामगारांचे कुटुंबीय व अन्य कामगारांनी या बोगद्याबाहेर संतप्त निदर्शने केली. (Uttarkashi Tunnel Accident)

या कामगारांच्या सुटकेसाठी आणलेले खोदकाम करणारे यंत्र मंगळवारी रात्री बंद पडले. परिणामी, दिल्लीहून नवीन यंत्र दाखल होईपर्यंत खोदकाम थांबले. यंत्रणांकडे बचावकार्यासाठी पर्यायी नियोजन नसल्याने मजुरांच्या कुटुंबीयांच्या संतापाचा बांध फुटला. नव्याने होत असलेल्या भूस्खलनामुळे माती कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत असून अडकलेल्यांच्या सुटकेसाठी स्टीलचा पाइप बोगद्यात सरकवण्याचे प्रयत्न फोल ठरले. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा : Health Department Guidelines : झिकाचा संसर्ग वाढला जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी)

बुधवारी संध्याकाळी मशिन दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कामगार सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला आहे. त्यांना पाइपद्वारे अन्नपदार्थ आणि आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. आपत्कालीन मदत केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या मजुरांमध्ये झारखंडमधील १५, उत्तर प्रदेशातील आठ, ओडिशातील पाच, बिहारमधील चार, पश्चिम बंगालमधील तीन, उत्तराखंड आणि आसाममधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेशातील एका मजुराचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.