Virat Kohli 50th Century : विराट आणि सचिन जेव्हा डेव्हिड बेकहमबरोबर फुटबॉल खेळतात 

विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमनेही उपस्थिती लावली. आणि विशेष म्हणजे यावेळी विराट आणि सचिन त्याच्याबरोबर थोडा वेळ फुटबॉल खेळले 

113
Virat Kohli 50th Century : विराट आणि सचिन जेव्हा डेव्हिड बेकहमबरोबर फुटबॉल खेळतात 
Virat Kohli 50th Century : विराट आणि सचिन जेव्हा डेव्हिड बेकहमबरोबर फुटबॉल खेळतात 

ऋजुता लुकतुके

विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपान्त्य सामन्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील कित्येक स्टार हजर होते. अगदी दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतही सामन्याला उपस्थित होता. (Virat Kohli 50th Century)  त्याचवेळी सामन्याचा सदिच्छा दूत म्हणून युनिसेफकडून हजर होते सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम.

गंमत म्हणजे सचिन आणि डेव्हिड बेकहम प्रथेप्रमाणे स्पर्धेचा चषक मैदानात नेऊन ठेवत असताना एक विचित्र गोष्ट घडली. दोघांनी चषक नेऊन ठेवला आणि तेवढ्यात एक फुटबॉल डेव्हिड बेकहमच्या दिशेनं आला. आणि तो मारला होता किंग कोहलीने.

बेकहमने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही क्लिप शेअर केली आहे. यात बॉल पहिल्यांदा विराटने बेकहमकडे भिरकावला. आणि तेंडुलकरने थोडं मागे होऊन बेकहमला तो घेऊ दिला. मग बेकहमने तो पुन्हा विराट कोहलीकडे दिला. कोहलीने मग चेंडू पुन्हा बेकहमकडे भिरकावला.(Virat Kohli 50th Century)

(हेही वाचा-Mumbai Airport : दिवाळीत विक्रमी उड्डाणे, दर दीड मिनिटाला उड्डाण किंवा लँडिंग सुरूच)

अशा रितीने दोघांमध्ये काही क्षण फुटबॉलचा सामना रंगला. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी एकच जल्लोष केला. बेकहमने मग भारतीय संघातील विक्रमवीर विराट कोहलीला मिठी मारून त्याची विचारपूस केली.

या सामन्यानंतर डेव्हिड बेकहमने आपली भारत भेट आणि उपान्त्य फेरीचा थरार यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ही माझी पहिली भारतभेट आहे. मला इथं यायचंच होतं. पण, अशावेळी आलोय की, मला एक मोठा विक्रम समोर घडताना पाहता आला, हे माझं भाग्य,’ अशा शब्दात बेकहमने स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.