भारताने शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी एक अब्ज डॉलर (सुमारे 83 अब्ज रुपये) खर्च केले पाहिजेत. (Narayana Murthy On Education) यासाठी जगभरातून 10 हजार अत्यंत सक्षम सेवानिवृत्त शिक्षकांना बोलावावे लागेल. ते आमच्या 2500 शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) मध्ये अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करू शकतील, असे आवाहन इन्फोसिसचे (infosys) सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले आहे. (Narayana Murthy On Education)
(हेही वाचा – Central Jail Of Maharashtra : ‘या’ चार कारागृहात मिळणार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा)
नारायण मूर्ती हे बेंगळुरू येथे पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी भारताच्या शालेय शिक्षण कार्यक्रमात मोठे पालट सुचवले आहेत.
नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, केवळ हा अभ्यासक्रम पुरेसा नाही. हा प्रशिक्षण कार्यक्रम एक वर्षाचा असावा. चार शिक्षकांचा एक गट वर्षाला 100 प्राथमिक आणि 100 माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षित करू शकतो. या प्रक्रियेद्वारे दरवर्षी 2.5 लाख प्राथमिक आणि 2.5 लाख माध्यमिक प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतील. (Narayana Murthy On Education)
(हेही वाचा – Virat Kohli 50th Century : विराट आणि सचिन जेव्हा डेव्हिड बेकहमबरोबर फुटबॉल खेळतात )
देशहितासाठी केलेल्या सूचनांचे स्वागत
भारतात विविध प्रकारच्या सूचना येतात. मला खात्री आहे की, आमच्याकडे तज्ञांचा एक गट आहे. तो गट आलेल्या सूचनांचे विश्लेषण करेल. त्यामुळे देशाच्या हिताच्या भावनेने दिलेल्या या सर्व सूचनांचे स्वागतच केले पाहिजे असे मला वाटते, असे आवाहन करून इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वांनाच या प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. (Narayana Murthy On Education)
काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता
इन्फोसिसचे अन्य एक सह-संस्थापक आणि फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन या वेळी म्हणाले, जसजसा आपला जीडीपी वाढतो, तसतसे आपल्याला काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता भासते. त्याच त्याच मार्गाचा अवलंब करून आपण सातत्याने प्रगती करू शकत नाही. (Narayana Murthy On Education)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community