मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज म्हणजेच गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मोठे नेते आपल्या पूर्ण ताकदीने प्रचारसभा घेतांना दिसत आहेत. अशातच अमित शाह यांनी अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितले. भाजपचे सरकार आले तर सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचे एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ, असे अमित शाह म्हणाले होते. त्यांच्या याच वाक्यावर आता मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सडकून टीका केली आहे.
(हेही वाचा – PM Modi to Mohammed Shami : वेल प्लेड शामी! PM मोदींनी दिली शाबासकीची थाप!)
शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स असं नवीन खातं उघडलं
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, गृहमंत्री अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स असं नवीन खातं उघडलं असेल. कुणी काय कामं केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आमिष कशाला दाखवता, असा टोला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावला.
(हेही वाचा – Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?)
उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहीजे
पुढे बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, यांनी महाराष्ट्रातील राजकीय परीस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यात घाणेरडी परिस्थिती आहे. मतदार येणाऱ्या निवडणुकीत काय करणार आहेत हे पाहावं लागेल. उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहीजे. राज्याची स्थिती संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. सध्याचं चित्र सरळ दिसत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community