Raj Thackeray : मनोज जरांगेच्या मागे कोण बोलतोय लवकरच समोर येणार; काय म्हणाले राज ठाकरे?

174

मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते की, असे कोणतेच आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  म्हणाले. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर आपली मते मांडली.

जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे महाराष्ट्रात होत होते, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय, माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जातपात मानत नाही, माणसाला महत्त्व देतो, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

(हेही वाचा Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटलांना नेमके काय हवे? वाचा सविस्तर…’या’ प्रश्नाचे उत्तर)

भाजपवर टीका 

मध्य प्रदेशमध्ये भाजपने मतदारांना मोफत आयोध्यावारी घडवण्याचे अश्वासन दिले. त्यावरुन राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray) की, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडणार आहेत असे वाटतेय, इतके वर्ष जे काम केले त्यावर निवडणुका लढवायला हव्यात.

मराठ्या पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन 

हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजण्यासंदर्भात निर्देश दिले त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण न्यायालय ठरवणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी पाट्या संदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हा व्यापारी न्यायालयात गेले, हे जातात कसे ? पण सरकारमधून काही हालचाली होत नाही. कदाचित आम्हालाच हात पाय हलवावे लागतील, असा इशाराच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.