शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवस आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन गेल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते तिथे आले. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
आमच्यासाठी शुक्रवार हा फार महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतीदिन आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचा स्मृतीदिन आहे. तो स्मृतीदिन आम्ही शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत. तो दिवस नाही. संपूर्ण जग बघतंय, असे अनिल देसाई यांनी मांडली. त्यांना आता निघू द्या. आम्ही शांततेचे आवाहन केले आहे. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व माहिती आहे, ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत, असेही अनिल देसाई यावेळी म्हणाले.
शिंदे गटाची प्रतिक्रिया
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीचे वागणूक करतात, त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे. हे निषेधार्ह आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.
Join Our WhatsApp Community