Rahul Dravid : विश्वचषकानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलणार?

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची सांगता ही द्रविडच्या सध्याच्या कराराची सांगता असणार आहे

229
Rahul Dravid : विश्वचषकानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलणार?

भारतात सुरु असलेल्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

तेव्हा दोन वर्षांच्या करारावर द्रविडने (Rahul Dravid) भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची सांगता ही द्रविडच्या सध्याच्या कराराची सांगता आहे.

दरम्यान क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, करार नूतनीकरणासंदर्भात बीसीसीआय आणि द्रविड (Rahul Dravid) यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. एकीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये द्रविडबाबत शंका असताना, दुसरीकडे मात्र वर्ल्डकप मधील संघाच्या अपवादात्मक कामगिरीमुळे मुदतवाढीचा प्रस्ताव येऊ शकतो.

(हेही वाचा – Australia in Final : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोक; ३ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भारतासोबत)

तथापि, द्रविड (Rahul Dravid) त्याच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत कायम राहण्याचा विचार करत आहे की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

भारत-ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर लवकरच भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत तीन एकदिवसीय, टी – 20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. (Rahul Dravid)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.