MP Assembly Election : 230 जागांसाठी मतदानाला सुरुवात

भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार चुरशीची लढत

151
MP Assembly Election : 230 जागांसाठी मतदानाला सुरुवात

मध्य प्रदेश विधानसभा (MP Assembly Election) निवडणुकीसाठी आज म्हणजेच शुक्रवार, 17 नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 230 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये (MP Assembly Election) सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

(हेही वाचा – Jalna OBC Sabha : जालन्यात ‘जमाव बंदी’चे आदेश)

मध्यप्रदेशात (MP Assembly Election) मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टी, बसपा, सपासह इतर अनेक पक्षही निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत, त्यामुळे ही लढत अधिक रंजक बनली आहे.

(हेही वाचा – Balasaheb Thackeray : स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटातील राड्यानंतर ; पोलीस अॅक्शन मोडमध्ये)

या निवडणुकीचा निकाल (MP Assembly Election) येत्या 3 डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील सर्वच जागा काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत, मात्र यापैकी 6 जागांवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ज्यामध्ये छिंदवाडा, दिमानी, चुरहट, दतिया, बुधनी आणि इंदोर यांचा समावेश आहे. (MP Assembly Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.