Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे, बस नाम ही काफी है!

413
Balasaheb Thackeray National Memorial : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची जागा २१५ चौरस मीटरने वाढली

एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण ’बाळ ठाकरे’ या नावाने व्यापलेलं होतं. महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली तरी त्यावर बाळासाहेबांचं मत काय आहे, हे जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असायचा. बाळासाहेब ठाकरे हे अग्रगण्य राजकीय नेते होते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला रोजगार प्रदान करुन देणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. (Balasaheb Thackeray Death Anniversary)

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र कुणालाही वाटले नव्हते की एक व्यंगचित्रकार महाराष्ट्राचा इतका मोठा नेता होईल. अर्थात त्यांच्या डोक्यावर त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा वरदहस्त होता. प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि सामाजिक नेते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान लाभले होते. (Balasaheb Thackeray Death Anniversary))

फ्री प्रेस जर्नल येथे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मार्मिक हे व्यंगचितरचं साप्ताहिक सुरु केलं आणि पुढे शिवसेना नावाची संघटना उभी राहिली. मराठी माणसाचा लढा लढताना त्यांनी हिंदुत्व देखील हाती घेतले. मात्र मराठी माणूस हा केंद्रबिंदू होता तेव्हा देखील शिवसेना हा पक्ष हिंदू विरोधी नव्हता. सुरुवातील त्यांनी कम्युनिस्टांच्या विरोधात लढा दिला. शिवसेना ही संघटना म्हणजे स्थानिक तरुणांना सोबत घेऊन विणलेलं जाळं होतं. बाळासाहेबांचा प्रभाव फिल्मी जगतावरही होता. त्यांना वादग्रस्त वाटत असलेल्या चित्रपटांच्या बाबतीत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे बर्‍याचदा निर्मात्यांना मातोश्रीच्या दारी यावं लागलं. हिटलर म्हणून त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की मी याचे समर्थनही करत नाही आणि नाकारत सुद्धा नाही.

(हेही वाचा : Loksabha Election : ‘या’ 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार)

बाळासाहेब ठाकरे हे उत्कृष्ट वक्ता होते. आपल्या विनोदी शैलीने ते श्रोत्यांना बांधून ठेवायचे. बाळासाहेब आणि शिवसेना म्हणजे दसरा मेळावा हे समीकरण जुळून आले होते. दसर्‍याला शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे ’विचारांचे सोने’ लुटायला प्रचंड गर्दी व्हायची. विशेष म्हणजे इतकी प्रसिद्धी मिळूनही ते कधी निवडणुकीला उभे राहिले नाहीत आणि सरकारमधील कोणतेही पद त्यांनी घेतले नाही. मुंबईमध्ये त्यांचा दबदबा होता. १७ नोव्हेंबर २०१२ वयाच्या ८६ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतयात्रेला प्रचंड गर्दी जमली होती आणि तरी देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही यात्रा पार पडली. आज या महान व्यंगचित्रकार, राजकीय नेते आणि वक्ते बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.