जेमिनी गणेशन (Gemini Ganesan) एक तामिळ अभिनेता होते. शाळेत असताना त्यांनी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून भल्याभल्यांना आपल्या खेळीने पराभूत केले आहे. ते श्वानप्रेमी होते. त्यांना गोल्डन रिट्रीव्हर्सची विशेष आवड होती. गणेशन यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्यात ते कधीही, कोणत्याही सार्वजनिक वादात अडकले नाहीत.
गणेशन (Gemini Ganesan) यांना डॉक्टर व्हायचे होते. एप्रिल १९४० मध्ये ते त्रिची येथील अलामेलू या मुलीला पाहायला गेले. अलामेलूच्या वडिलांनी गणेशन यांना पदवीनंतर वैद्यकीय पद मिळवून देण्याचे वचन दिले होते. गणेशन यांनी लगेच होकार दिला आणि जून १९४० मध्ये त्यांनी अलामेलूशी लग्न केले. मात्र लग्नानंतर एका महिन्यात त्यांचे सासरे वारले आणि गणेशनचे (Gemini Ganesan) डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. आता गणेशन यांच्याकडे नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
(हेही वाचा – Anushka Sharma : अनुष्का विराटपेक्षा श्रीमंत आहे का?)
सुरुवातीला गणेशन (Gemini Ganesan) यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागात लेक्चरर म्हणून काम केले. नंतर १९४७ मध्ये त्यांनी जेमिनी स्टुडिओमध्ये प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. या जेमिनी स्टुडिओमुळेच त्यांना “जेमिनी गणेशन” म्हटले जाऊ लागले. अशा पद्धतीने त्यांचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण झाले.
जेमिनी गणेशन (Gemini Ganesan) यांचे खरे नाव रामस्वामी गणेशन असे होते. जेमिनी गणेशन यांनी १९४७ मध्ये मिस मालिनी या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. पण १९५३ मध्ये थाई उल्लाममध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली आणि ते अभिनेता म्हणून नावारुपाला आले. मनम पोला मांगल्यम मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि हा त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटामुळे ते स्टार झाले. आपल्या अभिनयाद्वारे त्यांनी ५ दशकं रसिकांच्या मनावर राज्य केले. या काळात त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले.
(हेही वाचा – Happy Birthday ऐश्वर्या ! मॉडेलिंग आणि अभिनयाचा यशस्वी प्रवास…वाचा सविस्तर)
त्या काळी तामिळ चित्रपटसृष्टीवर तीन कलाकारांचं राज्य होतं. एक एम.जी. रामचंद्रन, दुसरे सिवाजी गणेशन आणि तिसरे (Gemini Ganesan) जेमिनी गणेशन. शिवाजी गणेशन ड्रामा चित्रपटांमध्ये काम करायचे, तर रामचंद्रन हे ऍक्शन हीरो म्हणून ओळखले जायचे आणि जेमिनी गणेशन यांना लोक रोमान्सचा देवता म्हणायचे. कारण अनेक रोमॅंटिक चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे.
जेमिनी गणेशन (Gemini Ganesan) कधीही राजकारणाच्या फंद्यात पडले नाहीत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना राज्यसभेची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. वैयक्तिक जीवनात त्यांचे अनेक बड्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पण त्यांना कुणाची हांजी हांजी करणे पसंत नव्हते. म्हणूनच ते राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले.
(हेही वाचा – Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी)
मात्र त्यांचे वैयक्तिक जीवन फार गुंतागुंतीचे होते. त्यांचा एकपेक्षा अधिक विवाह झाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री सावित्री ही देखील त्यांची पत्नी होती. त्यांना एकूण ८ मुले होती. प्रख्यात अभिनेत्री रेखा सुद्धा त्यांची मुलगी आहे. मात्र जेमिनी गणेशन (Gemini Ganesan) यांनी कधीही रेखाचा मुलगी म्हणून स्वीकार केला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community