नानजी कालिदास मेहता हे गुजरातमधील भारतीय उद्योगपती होते. त्यांनी ब्रिटिश ईस्ट आफ्रिकेत मेहता ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजची स्थापना केली होती. आता या समूहाचे मुख्य कार्यालय भारतात आहे. नानजी कालिदास मेहता यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८८७ रोजी ब्रिटिश भारतातील पोरबंदर संस्थानातील पोरबंदरजवळील गोराणा गावात झाला. त्यांचा जन्म लोहाणा जातीतील गुजराती हिंदू कुटुंबात झाला. (Owner Of Mehata Group)
१९०० मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी ते पूर्व आफ्रिकेला गेले. त्यांचे लहानपणीच लग्न झाले होते आणि त्यांचे दुसरे लग्न संतोषबेन मेहता यांच्याशी झाले. त्यांना चार मुले झाली – ‘दीदीजी’ सविताबेन मेहता, धीरुभाई मेहता, निर्मला मेहता आणि महेंद्र मेहता. स्पोर्ट्स कार ड्रायव्हर शेखर मेहता आणि उद्योगपती जय मेहता हे त्यांचे नातू आहेत.
नानजी कालिदास मेहता हे आर्य समाजाचे अनुयायी होते. त्यांनी पूर्व आफ्रिका आणि भारतात अनेक आर्य समाजी शाळा, कॉलेज आणि मंदिरे निर्माण केली. त्यांनी पूर्व आफ्रिकेत भाज्या, कापूस आणि ऊस पिकवण्याचा चमत्कार केला. पुढे त्यांनी साखर उत्पादन, चहा आणि कॉफीची शेती केली. युगांडामध्ये त्यांनी होइमा कॉटन कंपनी स्थापन केली.
तसेच त्यांनी भारतात सिमेंट कम्पनी, कापड उद्योग आणि तेलाची गिरणी इत्यादी व्यवसाय सुरु केले. त्यांनी मेहता समूहाची स्थापना केली आणि आता हा समूह जगभरात पसरला आहे. १९३२ मध्ये त्यांनी पोरबंदरमध्ये महाराणा मिल्स नावाची एक सूतगिरणी स्थापन केली. १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या दरम्यान कंपनीने २५०० कामगारांना काम दिले होते.
(हेही वाचा : Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे, बस नाम ही काफी है!)
नानजीभाई यांनी अनुसूचित जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या. १९५६ मध्ये त्यांनी गुजरातमध्ये सौराष्ट्र सिमेंट लिमिटेडची स्थापना केली. २५ ऑगस्ट १९६९ रोजी पोरबंदर येथे त्यांचे निधन झाले. नानजीभाई हे मोठे उद्योजक तर होतेच, मात्र त्यांनी समाजसेवेचा वारसा कधीच सोडला नाही.
Join Our WhatsApp Community