Rock Hudson : एड्स या आजाराने मरण पावलेला पहिला सेलिब्रिटी

157
Rock Hudson : एड्स या आजाराने मरण पावलेला पहिला सेलिब्रिटी
Rock Hudson : एड्स या आजाराने मरण पावलेला पहिला सेलिब्रिटी

रॉक हडसन एक अमेरिकन अभिनेता होता. जवळजवळ चार दशके त्याने सिने जगतावर राज्य केले. ज्या काळाला हॉलिवुडचे स्वर्ण युग मानले जाते, त्या काळातील सुपरस्टार म्हणजेच रॉक हडसन. हडसनचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. त्याचे खरे नाव रॉय हेरॉल्ड शेरेर ज्युनियर असे होते. त्याचे वडील एक ऑटो मेकॅनिक होते. ग्रेट डिप्रेशनच्या काळात वडिलांची नोकरी सुटली आणि नंतर त्यांनी कुटुंबाचा त्याग केला. १९३२ मध्ये त्याच्या आईने दुसरे लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. (Rock Hudson)

मॅग्निफिशेंट ऑब्सेशन, ऑल दॅट हेवन अलॉव आणि जायंट यांसारख्या अत्यंत लोकप्रिय चित्रपटांमुळे हडसनला स्टार बनवले. हदसन त्या काळचा ६.५ फूट उंच व देखणा अभिनेता होता. जायंटमधील त्याच्या अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याकरिता अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पिलो टॉक, लव्हर कम बॅक आणि सेंड मी नो फ्लॉवर्स यांसारख्या चित्रपटांनी त्याला रोमँटिक हीरोची ओळख मिळवून दिली.

(हेही वाचा : Owner Of Mehata Group : भारतीय उद्योजक – नानजी कालिदास मेहता)

१९६० च्या दशकाच्या सेकंद, टोब्रुक, आणि आईस स्टेशन झेबरा अशा चित्रपटांमुळे करिअरच्या उत्तरार्धात त्याची जादू कायम राहिली. पुढे त्याच्या वाटेला चांगले चित्रपट न येऊ लागल्याने तो वैतागला आणि टेलिव्हिजनकडे वळला. १९७१-१९७७ दरम्यान मॅकमिलन अँड वाइफ या लोकप्रिय रहस्यमय मालिकेमुळे त्याला टेलिव्हिजनच्या क्षेत्रातही यश मिळाले. अनेक चित्रपट मासिकांनी हडसनचा स्टार ऑफ द इयर, फेव्हरेट लीडिंग मॅन म्हणून गौरव केला. चार दशकांहून अधिक काळ त्याने कला-जगतावर राज्य केले. या दरम्यान त्याने सुमारे ७० चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले.

१९८४ दरम्यान प्राइमटाइम एबीसी सोप ओपेरा डायनेस्टी मध्ये त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून शेवटची भूमिका केली. एड्स या जीवघेण्या आजाराशी लढताना त्याला काम करणे अशक्य होऊन बसले. २ ऑक्टोबर १९८५ रोजी वयाच्या ५९ वर्षी त्याचा मृत्यू झाला. मात्र एड्स या आजाराने मरण पावणारा तो पहिला सेलिब्रिटी ठरला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.