Ind vs Aus Final : अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादेत वायूदलाचा एअर शो

257
Ind vs Aus Final : अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादेत वायूदलाचा एअर शो

ऋजुता लुकतुके

रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आणि या सामन्याच्या वेळी भारतीय वायूदलाचा सूर्यकिरण चमू इथं एक एअर शो सादर करणार आहे.

१९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी दोन वाजल्यापासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ स्पर्धेसाठी इथं दाखल झाले आहेत. अंतिम सामन्या दरम्यान भारतीय वायूदलाचा एअरोबॅटिक चमू ‘सूर्यकिरण’ हा एअरशोही सादर करणार आहे. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

(हेही वाचा – Ind vs Aus Final : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल)

अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करेलं. शुक्रवार आणि शनिवार या शोसाठीचा सरावही याच मैदानात होणार आहे. विमानांच्या हवेतील कसरतींबरोबरच यात विविध रंगाची उधळणही असणार आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूर्यकिरण ताफ्यातील नऊ विमानं या प्रात्यक्षिकांत सहभागी होणार आहेत. आणि हवेत विमानांचा वेग कमीजास्त करून केली जाणारी फॉर्मेशन्स, तसंच विमानांचे मिळून हवेच तयार होणारे वेगवेगळे आकार हा प्रात्यक्षिकांचा मुख्य भाग असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.