India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल 

बुधवार आणि गुरुवारी झालेल्या उपान्त्य सामन्या दरम्यान इंडिगो विमानाच्या एका वैमानिकाने विमान चालवतानाच लोकांना उपान्त्य सामन्यांचे अपडेट उद्घोषणे द्वारे दिले. हा क्रिकेट रसिक वैमानिक लोकांना चांगलाच लक्षात राहिलाय. आणि त्याचे व्हीडिओही व्हायरल होतायत

153
India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल 
India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल 

ऋजुता लुकतुके

विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य सामन्या दरम्यान तुम्ही विमान प्रवास करत असाल तर स्कोअर समजण्याचा कुठलाही मार्ग तुमच्याकडे नसतो. कारण, प्रवासात बहुतेक जणांचं इंटरनेटही बंद असतं. (India in Final) पण, अशावेळी वैमानिकाने अधून मधून तुम्हाला सामन्यातील रंगत सांगितली तर?

असा अनुभव इंडिगो विमानातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी मागचे दोन दिवस घेतला. खासकरून भारताच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी तर ही उद्‌घोषणा चांगलीच उचलून धरली. भारताने या सामन्यांत ७० धावांनी विजयही मिळवला.

एक प्रवासी नीरज यांनी बेंगळुरूला जातानाचा आपला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. दर अर्ध्या तासाने लोकांना सामन्याचा अपडेट मिळत होता, असं त्यांनी आवर्जून लिहिलं आहे.

‘इंडिगो विमानाचा आमचा वैमानिक विमान बंगळुरूला पोहोचेपर्यंत आम्हाला दर अर्ध्या तासाने सामन्याचे अपडेट देताना बघून खूप छान वाटलं,’ असं शाह यांनी ट्विट केलं आहे. त्यावर इंडिगो कंपनीनेही ट्विटला उत्तर दिलं आहे.

‘आमच्या वैमानिकाने तुम्हाला सामन्याचा लाईव्ह आनंद दिला हे छानच झालं. आमच्या विमान कंपनीचा हाच प्रयत्न असतो. प्रवाशांना विमानात मनोरंजन आणि माहितीही मिळावी.’

नीरजा यांच्या ट्विटला इतरांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. एका व्यक्तीने भारत वि. न्यूझीलंड २०१९ विश्वचषकाच्या वेळची आठवण सांगितील. ‘भारताला शेवटच्या पाच षटकांमध्ये ५१ धावा हव्या होत्या. आणि धोणी, जाडेजा अजून खेळतायत हे कळल्यावर प्रवाशांनी विमानातच जल्लोष केला होता,’ अशी आठवण मुकुल पाठक यांनी सांगितली. तेव्हा उपान्त्य लढत भारताने गमावली होती.

पण, यावेळी भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ३९७ धावांची मजल मारली. आणि मग शामीने ७ गडी बाद करत न्यूझीलंडचा डाव ३२७ धावांमध्ये संपुष्टात आणला.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.