India vs Aus Final : भारत सलग ९ सामन्यांमध्ये विजयी पण, कर्णधार रोहित शर्माला ‘या’ गोष्टींची चिंता 

भारतीय संघाने न्यूझीलंडला उपान्त्य सामन्यात ७० धावांनी हरवलं. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. पण, कर्णधार रोहित शर्माला अजूनही काही गोष्टींची चिंता वाटते 

149
India vs Aus Final : भारत सलग ९ सामन्यांमध्ये विजयी पण, कर्णधार रोहित शर्माला ‘या’ गोष्टींची चिंता 
India vs Aus Final : भारत सलग ९ सामन्यांमध्ये विजयी पण, कर्णधार रोहित शर्माला ‘या’ गोष्टींची चिंता 

ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ ऐतिहासिक कामगिरीच्या (India vs Aus Final) उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत १० सामन्यांमध्ये अपराजित असलेला हा संघ आणखी एक सामना जिंकून विश्वचषक २०२३ आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. उपान्त्य सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. पण, या सामन्यातली भारतीय खेळाडूंची कामगिरी कर्णधार रोहित शर्माला मात्र खटकतेय. अंतिम सामन्यापूर्वी काही गोष्टी सुधारायला हव्यात, असं त्याने उघडपणे बोलूनही दाखवलं आहे.

‘आमचं क्षेत्ररक्षण खराब झालं,’ रोहीत सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करत ३९७ धावा केल्या त्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या जोरावर. नंतर महम्मद शामीने ५७ धावांत ७ बळी घेऊन संघासाठी कामगिरी फत्ते केली.

७० धावांनी मिळवलेला हा विजय सोपा वाटत असला तरी न्यूझीलंडतर्फे केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांनी चौथ्या गड्यासाठी १८१ धावांची भागिदारी करून भारतासमोर आव्हान उभं केलं होतं. आणि या भागिदारीचीच काळजी रोहितला वाटत आहे.

(हेही वाचा-Sharad Koli : ठाकरे गटाचे शरद कोळी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल )

‘मी मुंबईत भरपूर क्रिकेट खेळलो आहे. मला इथला चांगला अनुभव आहे. या खेळपट्टीवर कितीही मोठी धावसंख्या रचली तरी प्रतिस्पर्धी संघ सर्वबाद होती, तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे ३९७ धावा केल्यावर किवी फलंदाजांना जराही संधी न देता त्यांच्यावर सतत दडपण ठेवणं आवश्यक होतं. पण, आम्ही त्यांना संधी दिली,’ असं रोहित संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना म्हणाला.

जाडेजासारख्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकानेही काही धावा जाऊ दिल्या. आणि महम्मद शामीने ७ बळी घेतले असले तरी केन विल्यमसनचा झेल मोक्याच्या क्षणी सोडला, या गोष्टी रोहित विसरलेला नाही. ‘फलंदाजांनी ३०-४० धावा कमी केल्या असत्या तर कदाचित दडपण आणखी वाढलं असतं,’ असं रोहीतला वाटतं.

त्याचबरोबर रोहितने पहिल्या सहा फलंदाजांचं कौतुक केलं. एखादा बळी तसंच एखादा धावचीत सामन्याचा (India vs Aus Final) रंग पालटू शकतो, त्यामुळे या गोष्टीचं सतत भान ठेवण्याची सूचना संघ सहकाऱ्यांना केली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.