BJP’s Mission 45 : लोकसभा निवडणूक, भाजपचे धोरण ठरले…नविन चेह-यांना मिळणार संधी

109
BJP's Mission 45 : लोकसभा निवडणूक, भाजपचे धोरण ठरले...नविन चेह-यांना मिळणार संधी
BJP's Mission 45 : लोकसभा निवडणूक, भाजपचे धोरण ठरले...नविन चेह-यांना मिळणार संधी

मिशन ४५ (BJP’s Mission 45) अंतर्गत महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने धोरण ठरवायला सुरुवात केली आहे. यानुसार विद्यमान खासदारांना डावलून लोकसभा निवडणुकीसाठी नविन चेह-यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सुत्रांनी दिली आहे.

तसेच भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच स्तरावरील नेत्यांसोबत चर्चा सुरु केली असून नविन धोरण तयार केले असल्याची देखील माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. त्यात अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन मोठे महाभारत घडण्याची शक्यता आहे.

तसेच भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांपुढे एक फॉर्म्युला ठेवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपने आपले मिशन ४५ (BJP’s Mission 45) चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जुन्या चेह-यांऐवजी नव्या चेह-यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या या भुमिकेमुळे महायुतीमधील घटक पक्षांच्या जुन्या नेत्यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा-Cabinet Meeting: मंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिंदेंच्या मंत्रिमंडळाने कॅबिनेट बैठकीत घेतलेले निर्णय, वाचा…कोणते?)

भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी २, तर मुंबईतील एका जागेवरील (BJP’s Mission 45) उमेदवार बदलण्याची नितांत गरज असल्याचे सर्वेक्षकांचे मत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन महायुतीत मोठे महाभारत घडण्याची भाती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

तसेच भाजपने यासाठी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये भाजपला काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. राज्यातील नागरिकांनी महायुतीच्या कारभारावर समाधान व्यक्त केले आहे. शिवाय राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी जवळपास ४२ जागांवर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.