संजय राऊत हा महाराष्ट्रातील शकुनी मामा आहे. त्याचे बोलणे कोणी गांभीर्याने घेत नाही. मीही त्याला महत्त्व देत नाही. आज त्याचे नाव घेणेसुद्धा उचित ठरणार नाही, असे म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राऊतांवर टीकास्र डागले.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोंधळ घालणाऱ्या गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर होता. २०२४ला पिक्चर दाखवणार, असे संजय राऊतांनी म्हटले होते. यावर बोलताना रामदास कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून बाळासाहेबांची मातोश्री आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झाल्याचा घणाघात केला.
(हेही वाचा – World Cup 2023: वर्ल्ड कप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर)
रामदास कदम पुढे म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मातोश्रीवर राहून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर संघर्ष केला. ज्या दिवशी कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याची वेळ येईल. त्या दिवशी शिवसेना मी बंद करेल, असेही बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले होते, मात्र त्यांच्या मुलाने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसबरोबर जात बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता मातोश्रीही बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नसून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली आहे, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community