Beauty Tips: पार्लरला जायला वेळ नाही, ‘या’ सोप्या टिप्स वापरा; चेहऱ्याला येईल इन्स्टंट ग्लो

हल्ली बहुतेक सौंदर्य उत्पादनात कोरफडीच्या गराचा वापर केला जातो.

224
Beauty Tips: पार्लरला जायला वेळ नाही, 'या' सोप्या टिप्स वापरा; चेहऱ्याला येईल इन्स्टंट ग्लो
Beauty Tips: पार्लरला जायला वेळ नाही, 'या' सोप्या टिप्स वापरा; चेहऱ्याला येईल इन्स्टंट ग्लो

अतिव्यस्त राहिल्याने आणि कामामुळे शरीर थकून जाते त्यामुळे थकवा येतो. थकवा आल्याने चेहऱ्यावरचा ग्लो हळूहळू कमी होतो. यामुळे चेहरा रुक्ष, त्वचा नित्सेज दिसू लागते. अशा वेळी इतर कामाच्या गडबडीत पार्लरमध्ये (Beauty Tips) जायला वेळ नसतो. अशा वेळी घरच्या घरी सोप्या टिप्स वापरून हरवलेला ग्लो परत येऊ शकतो.

हल्ली बहुतेक सौंदर्य उत्पादनात कोरफडीच्या गराचा वापर केला जातो. त्वचेच्या बहुतांश समस्यांवर कोरफडीचा गर वापरतात. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. कोरफडीच्या गरामुळे चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो येऊ शकतो. पाहूया कोरफडी गरामुळे चेहरा चमकदार होतो. याकरिता पाहूया घरच्या घरी या गरापासून फेशियल कसे करायचे ?

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस मिसळून घ्या. हे मिश्रण एकजीव करून केसांना लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. एलोवेरा जेल व लिंबाच्या रसात असणारे अँटीऑक्सिडंट्स आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. यामुळे आपल्या त्वचेतील घाण निघून जाण्यास मदत होते.

(हेही वाचा – Tuberculosis Detection Campaign : येत्या सोमवारपासून क्षयरोग आणि कृष्ठरोग्यांचा घराघरांमध्ये जावून घेणार शोध)

त्यानंतर चेहऱ्याला स्क्रबिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर घ्यावा. त्यात लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ मिसळावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. यानंतर हलक्या हाताने स्क्रब करावे. यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जायला मदत होईल. चेहऱ्यावरील काळपटपणाही निघून जाईल.

तिसऱ्या टप्प्याला कोरफडीच्या गरात मध घालून १० ते १५ मिनिटे मसाज करावा. गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवरील रक्ताभिसरण सुरळीत होऊन त्वचेला ऑक्सिजन मिळतो. त्वचा मुलायम होण्यासाठी या मिश्रणचा फायदा होतो.

सगळ्यात शेवटी फेसमास्क तयार करावा. याकरिता कोरफडीच्या गरात चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिसळावे. हा मास्क २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर चेहरा कोरडा करून मॉइश्चरायझर लावावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.